कसा मलूल झालेला असतो हा दुपारचा प्रकाश
कसा फुलवीत असतो फुलानसार्खा सुवास
कसा भरून येतो त्याच्या काळजाचा तुकडा
नि कसा हुंगून घेत असतो हा श्वास
झाडेपण शांत असतात ध्यान लावून बसतात
परत येणाऱ्या पाखरांची वाट बघत असतात
आभाळ कसे मलूल मलूल तरी ते सुंदर वाटते
निळ्या निळ्या आभाळात काळोख कालवीत बसते
हळूहळू त्याचा रंग बदलत जातो
देवाजवळचा दिवा तेव्हा छान वाटत असतो
आभाळातला कबरा सावळा रंग पाखरांसाठी असतो
पाखरे कशी शांत नि ध्यान लावून असतात
गोठ्यातील गाय पण कशी शांत नि शांत असते
आपल्या पिलाला कशी चाटत असते
संध्याकाळचे दूध फक्त पाडसासाठी असते
पाडस जेव्हा लुचते तेव्हा गाय कशी तृप्त वाटते
अशी ही संध्याकाळ गोजिरवाणी असते
मुउ मुउ मायेने गच्च भरून जाते
आई जेव्हा बाळाची द्रिष्ट काढीत असते
संध्याकाळ तेव्हा डोळे भरून बघते ...