अबोल प्रीत..

बोलायचं असत तेव्हा
तु भेटत नाहीस
दिसतेस मला तु तेव्हा
शब्द फुटत नाहीत
एकांतात तुझ्या स्मरणाने 
हळुच मी हसतो
प्रत्यक्ष मात्र भेटल्यावर
हसूच विसरून जातो
तु ही प्रेम करतेस 
पण तसं दाखवत नाहीस
डोळ्यांतील  भावना मात्र
लपवू शकत नाहीस
आपल्या या प्रेमाला
दिशा तूच देऊ शकतेस
माझी अबोल प्रीत
तू या कवितेतून जाणू शकतेस..