प्रार्थनेचे सूर येतात दूरवरून
लांबून ..पहाडातून
किती नि कसे छान वाटते
हिरव्या माळरानावरून तरंगत येतात
ते दैवी सूर
मन कसे शांत नि शांत होते
बघा एकदा अनुभवून
पाखरांचा स्वर
त्यांचा वावर
झाडाचे असणे
फुलणे
निळ्या निळ्या डोंगरावरून येणारी झुळूक
ही सगळीच प्रार्थनेची
टिंबे,उदगारचिन्हे ,वेलांट्या नि मात्रा
नि कडवी
मन जाते हरवून
बघा एकदा अनुभवून
हिरव्या मैदानावचे गुरांचे चरणारे कळप
ती शांत नागमोडी नदी
पाखरांचे आवाज
फुलपाखरांचे फुलाभोवती
गिरकत राहणे
हेपण असतात प्रार्थनेचे सूर
बघा एकदा अनुभवून
देवाजवळचा दिवा
समयी ..निरांजन
त्याचा मंद प्रकाश
किती पवित्र वाटतो
घ्या मनात साठवून
कहीही न मागणे
निव्वळ आभार मानणे
बघा एकदा अनुभवून