एक घर विकत घ्यायचे आहे ..!!

खरेच एक घर विकत घ्यायचेय  त्याला 
कोणी देईल का घर .?
एक किचन ,एक बेडरूम, एक हाल  
कोठे मिळेल का घर? 
उपनगरात देखील चालेल 
त्याचे प्रेम जमलेय 
नि तो लग्न करायचेय म्हणतोय 
ती कबुल झाली आहे 
तिने स्वीकार केलाय त्याचा 
मनापासून 
पण घर तर  हवे आहे 
कोठे मिळेल का घर ? 
एका प्रेमिक जोडीला घर हवे आहे 
एक छोटेसे छान नि मस्त घर 
तो सजवणार आहे घराला 
छोटीशी बेडरूम 
एक आभाळ टांगून ठेवणार आहे छताला 
खिडकीतून दिसावे एखादे झाड 
नि मस्त आभाळ 
छानसा चंद्र आंणी निव्वळ निवांतपण  त्याला हवा  आहे 
असे मिळेल का घर त्याला 
त्याचे  छानसे स्वप्न  आहे  
स्वप्न तर नाहीतना  महाग ?
पाउस पडताना तो तिलाच आठवतो  
ती चक्क त्याला दिसू लागते  
पावसाच्या थेम्बातून 
ती अलगद उतरते 
मस्त पावसासारखी झिम्म बरसते 
त्याला  हवीय एक बेडरूम, हाल, किचन 
 
त्याच्या मनात कसे स्वप्न फुलते 
पाखरू होऊन कसे झुलते 
पण घराची आठवण येताच ते चक्क फुटून  जाते 
एक साधेसे घर 
त्याच्या शोधात तो  
तो शोधतोय घर 
कोठे असेल तर सांगा 
त्याला लग्न करायचेय 
फुलासारखे तिला जपायचेय 
पण त्यासाठी त्याला घर हवेय 
सांगा कोठे स्वस्तात मिळत असेल एखादे घर 
त्याला खरेच टांगून ठेवायचेत एक आभाळ 
तो कासावीस झालाय 
कोणीतरी पाठीशी उभा राहील देवासारखा 
नि घर मिळवून देईल 
तो वाट बघतोय 
त्याला  हवीय एक बेडरूम, हाल, किचन