सगळेच अवघड होऊन बसले आहे ...!!

जगणे अवघड होऊन बसले आहे 
काही नाही तरी काहीतरी हवे आहे 
घरावरचे निळे आभाळ 
चंद्र चांदण्या नि काय नि काय 
सगळे डकवून ठेवले आहे 
कधी कोसळेल हे आभाळ 
कुणास ठाऊक ...?
सगळेच अवघड होऊन बसले आहे हे ... 
 
कधी केव्हाही कोसळत असतो हा पाऊस
सगळे ऋतू विसरून गेले आहेत 
त्यांचे एक-एक बहाणे 
जीव कासावीस करतात 
कोण आवरणार ह्या निसर्गाला [?]
सगळेच अवघड होऊन बसले आहे 
  
कुत्र्यांचे लोम्पाट फिरत असतात रस्त्यावरून भर दिवसा 
रात्री कधीही केव्हाही 
भुंकतात जीव तोडून भन्नाट 
[त्यांना कोठे काळवेळ राहिला .
भाद्रपद त्यांचा कधीच संपला 
तरी ते फिरत असतात कुत्री मागे 
नि ती पण मस्त झुलवत असते 
 ह्या गल्लीतून त्या गल्लीत झुकांडी देत ] 
प्राणीमित्रांनी त्यांना अभय दिले आहे 
सर्वसामन्य माणसाचे 
सगळे अवघड होऊन बसले आहे 
  .. 
रस्त्यावर ठिकठिकाणी टोल नाके 
खंडणी वसूल करीत आहे 
कधीतरी घेतलेली गाडी घरामध्ये शांत आहे 
कोण काढणार बाहेर 
नाक्यावर टोळधाड सज्ज आहे 
 
आतंगवादी  घुसले आहेत 
ते काहीही करू शकतात 
कोठेही स्फोट घडू शकतो 
त्यांनी स्वताला मृत्यूच्या हवाली कधीच केलेय 
ते वाट बघत आहेत ईशार्याची 
आज काहीही घडू शकते 
उद्या पण ....
आता  जगणे खरेच अवघड झाले आहे 
शप्पत खरोखर 
जगणे अवघड नि फक्त अवघड झाले आहे .........!!