काही आनंदाचे काही दुःखाचे क्षण
ज्यांना आठवताच नेहमी हेलावाते हे मन
ज्यांना आठवताच नकळत खुलते गालावर हासू
आणि नकळतच डोळ्यांतून मोकळे होतात आसू
रिमझिम श्रावण धारांमध्ये भिजलेले ते क्षण
वाफाळलेल्या चहाच्या चविमध्ये विरघळलेले ते क्षण
पहिल्यांदा त्याला पाहिले तो क्षण
पाहिले आणि पाहतच राहिले तो क्षण
त्याच्या त्या खोल डोळ्यांत हरवले तो क्षण
हरवतानाच ख़ूप काही सापडले तो क्षण
तो समोर येताच हृदयाचे ठोके चुकवणारा क्षण
आणि तो समोर नाही तेव्हा तेच ठोके वाढवणारा क्षण
तो दिसला नाही म्हणून कासाविस होणारे मन
आणि त्या मनाची समजूत घालताना त्याच्या आठवणी हरवणारे ते क्षण
तो समोर असला तर चटकन सरून जाणारे ते क्षण
आणि तो नसताना विरहाची जाणीव करून देणारे ते क्षण
त्याचा हातात गुलाब देताना थांबलेला तो क्षण
त्याच्या गालावरचं निखळ हास्य पाहताना लांबलेला तो क्षण
हा क्षण तो क्षण आणि असे कित्येक क्षण
सुखाचे दुःखाचे त्याच्या आठवणींचे क्षण
इतके सुंदर असूनही हरवले ते क्षण
त्या क्षणांच्या आठवणी अंती उरले फ़क्त पण
त्याच्या आठवणींत घालवलेले क्षण ते निस्वार्थ
त्या क्षणांनीच शिकवला प्रेमाचा अर्थ
पण.... पण आता हरवले ते क्षण आणि त्या क्षणांतील पण
हरवला तोही हरवली मीही आणि हरवली त्या क्षणांची आठवण....