उजाडले आहे
एक मंद्सर हसरे समाधान
क्षितिजरेषेवर प्रगट होत आहे
पाहता पाहता ते लालसर बिंब
वर सरकायला लागले
किरणाचे पिवळसर रान सर्वत्र पसरले
तो म्हणाला ...माझे भाग्य माझे भाग्य
मला दिसायला लागले ....
त्याने हात पसरले,तो धावत क्षितिजाकडे गेला
म्हणू लागला
रात्र सरली आहे
अंधार ओसरतो आहे
मला वाटा दिसत आहे
मार्ग मोकळे होत आहेत
अडथळे दूर सरत आहे
ती वाट प्रयत्नाची अन ती ...
ही श्रमाची कष्टाची वाट
आता माझ्या जगण्याचा
खरा जन्म होत आहे
पुढे
यश अपयशाची मापे तो मोजू लागला
प्राक्तनात झिरपणारा काळोख पाहू लागला
सूर्य जसा मध्यान्ही आला
तसतसा देहाचा दाह वाढत गेला
सूर्य मावळतीकडे सरकू लागला
तो म्हणाला ....कालांतराने
सूर्य मावळेल सांज होईल गात आयुष्यातील आठवणीचे तरंग
दूर जातील. मग ..
आपणही मावळणार आहोत .
सूर्य म्हणजे एक टिंब काळाचा..
एक अनुस्वार अन एक पूर्णविराम
श्वासाच्या महेफिलीतला .