माझ्या घरावर टेरेस आहे
नि टेरेसवर एक आभाळ
आता ते पूर्वीसारखे नाही राहिले गोजिरवाणे
पूर्वी कसे निळे निळे आभाळ
नि कधी कधी त्यावर पांढर्या शुभ्र ढगांचा कल्लोळ ...
पावसाळ्यात गच्च काळे ढग
आणि त्यात झिरपत असायची आभाळाची निळाई
आता ती निळाई कोठे गायब झाली कुणास ठाऊक ?
मोतीबिंदू पडावा तसा भुरकटपणा सर्वत्र
आभाळभर ....
मी शांत ..!
मुकाट ..!!
बघत असतो त्याची फिकुटलेली कांती... चेहरा
गिरण्याच्या धुराने पार कोंडून टाकलाय त्याचा श्वास
अवघड करून टाकलय त्याचे , आपले ,माझे जगणे
मला वाटते शेवटची घरघर लागलींय
मी बघतोय उदासवाणे ,क्लांत होऊन
काही पर्यावरण मित्र करतायत अथक प्रयत्न
मी प्रार्थना करतोय
माझ्या हातात तेवढेच ...
फक्त ...!!