गर्दीचे लोटच्या लोट
एकही पत्ता सांगेना
अनंताचा पत्ता
कुणासही ठाऊक असेना
एकजण थांवून म्हणाला
"अशानं लोकं वेडा ठरवतील
अरे निदान कडेला हो
नाहीतर तुला धोंडाळतील"
असे म्हणून हासत हासत
तो गर्दीत लुप्त झाला
पाठमोरा त्याला पाहून
जीव उगीचच गांगरला
रात्र गेली, दिवस गेले
वर्षामागून वर्षे गेली
शतकानुशतका पासून
मी उभा पत्ता विचारीत
देहावरचे कपडे बदलून
मला आले गलबलून
कंटाळणे मंजूर नाही
गर्दीला गती नाही
म्हणूनच सीतेसारखे
जमिनीत शिरणे
मला अजिबात मान्य नाही .