आयुष्याच्या प्रवासात एक तुझीच सोबत
दुजा कुणी नको मला सखा मित्र आणि संत
जन सांगून दमले आप्त थकले भागले
वेडे मन मात्र माजे तुझ्या प्रेमात गुंतले
तुझ्या भेटीचीच आस तुझ्या चरणाचा ध्यास
कधी दाखवशील मला तुझ्या चेहऱ्याचे तेज
तुझ्या दर्शना नंतर नको प्रपंच संसार
कधी जगतो का पतंग दिवा भेटी नंतर