कंटाळा आला आहे मला आता

कंटाळा आला आहे मला आता,
झोप सुद्धा येत नाही माझ्या वाटा,
वाचून झाले सगळे कोड्स आणि त्यांचा सविस्तर डेटा,
पुरे झाले सॉफ्टवेयर आता,
स्वप्नातल्या परीला बरं तुम्हीच कुठेतरी भेटा,
आधार आहे मित्रांचा पण तोही तुमच्यासमोर छोटा,
हे कोडिंगचं काम करून नाही वाटत मोजाव्याश्या नोटा,
किती सहन करायचा तुमचा दुरावा मी आता,
माझ्या हृदयाचा त्रास आता करू नका मोठा,
नाहीतरी माझ्या आश्रुंचा तुम्हांस कुठे दिसणार आहे साठा,
तुमच्याशिवाय वेळही बघा सरकत नाही आता,
कंटाळा आला आहे मला आता,
म्हणून म्हणतो तुम्हांस मला कुठेतरी भेटा,
कंटाळा आला आहे मला आता,
झोप सुद्धा येत नाही माझ्या वाटा.
- यशपाल पाटील (९९७००११८३९)