शब्दांचे भरघोस पिक येऊ लागले आहे
कोठेही पेरा मनात
ते मस्त तरारून येतात
शब्द पेरा नि वाहवा चे नुसते खत घाला
प्रचंड फुलून येतात
मनाची नि नेटची जमीन अंतहीन आहे
कितीही पेरा
भरपूर जागा शिल्लक आहे
शब्दाचे बियाणे कोठेपण पेरा
वाळवंटात पेरा
पाण्यात उधळा
त्याला पटकन कोंब फुटून कशे तारार्रून येतात बघत रहा
शब्द कसे का असेना
अक्षर कसेका असेना
यडे...!
गबाळे ...!!
कुरूप....!!
टक्क काळे
टायपत गेले की छान होऊन बाहेर पडतात
दात कितीका वाकडे असेना
थोडे पैसे फेका
व्यगोपचार करून घ्या
चांगल्या दाता पेक्षा सुंदर दिसतात हे दात
छान हसू फुलवून घ्या
शब्द पेरा
कोठेही कसेही
फक्त वाहवाचे खत घाला
तुमच्या आनंदासाठी
त्याचे मोफत वाटप करा
पैसे घेऊन ते विकता येणार नाही
कारण
शब्द पेरणारे येथे
मोजता येणार नाहीत
ईतके अमाप आहेत
शब्द पेरा
भरभरून दाद देणारे येथे
रसिक आहेत .......