कावळे काळे कुळकुळीत
निबर ,निगरगट्ट
बदमाश
भामटे
लबाड
हुशार
काहीपण खातात
मेलेला उंदीर .घूस .उस्टे खरकटे
भाकरी ,पोळी
शिंकरलेले , शेंबूड
व्हेज नॉन व्हेज ,
तरी ते गुबगुबीत
मस्त कलंदर
त्यांना नसते भीती कुणाची
त्यांची नाही कोणी करीत शिकार
ते असतात चिरंजीव
एकाक्ष तरी तिखट नजर
कावळे नुसते कावळे नसतात
पिंडाभोवती घिरट्या घालून
पिंडाला न शिवून माणसाला रडकुंडीला आणणारे
कुणाचे तरी प्राण असतात
एकाक्ष असले तरी चाणाक्ष असतात
कावळे अंडी घातल्यावर होतात आतंगवादी
त्यांची अंड्याला असते 'Z' सुरक्षा
कोणी जवळून गेला तरी ते झडपतात
हैराण नि हैराण करतात
तरी अंडी घातल्यावर अशी का वागतात ?
एवढी आतंगवादी का होतात ?
कशासाठी ?
प्रत्येकाला आपले अंडे प्रिय असते
की अंडे नुसते अंडे नसते
त्यात जगण्याचे स्पंदन असते
हे शप्पत त्यांना माहित असते म्हणून ????