हा पाऊस खरंच खुळा आहे
नको नको म्हणत असतान अगदी
उनाड होउन येतो
नेतो मग आठ्वांच्या गावा
अन दाखवतो जुन्याच पाउलखुणा
मग हिरव्या होतात ना जखमा
हा पाऊस खरच खुळा आहे
झरतो होउन स्रावण सरी
अन खुदकन हसतो गाली
घालून फुंकर मग हळ्वी
नाहीसा होतो दिशातूनी
हा पाऊस खरच खुळा आहे
वसंत होऊनी फुलतो मनी
नव्या धुमाऱ्यातूनी झुलतो रानोरानी
अन माझ्याही नकळत
ओघळतो पिकल्या पानापरी
हा पाऊस खरच खुळा आहे सखे
हा पाऊस .......