फादर ऍण्ड डॉटर

मला प्रचंड आवडलेला एक ऍनिमेशनपट . कलाकाराने त्याच्या कुंचल्याने जसा सुंदर चित्र रेखाटाव अगदी तसाच अनुभव ही

शॉट्र फिल्म पाहताना आला . केवळ ८ मि. दिग्दर्शकाने वडील- मुलीच्या नात्याचा प्रवास दाखवला आहे .  वडील मुलीला सोडून परगावी जातात एका बोटीतून आणि पुन्हा कधिच येत नाहीत नंतर ती रोज त्या ठिकाणी येते कधी माइत्रींब्ररोबर कधी एकटी काही वषानी नवऱ्याबरोबर मग मुलांबरोबर . आयुष्याचा प्रत्येक टप्पा हा फिरणाऱ्या चाकबरोबर सरकत जाताना अतिशय प्रभावीपणे दाखवला आहे.केवळ काळ्या पांढ्ऱ्या रंगाच्या जोडीने दाखवलेला हा पट कितीतरी भावनांचे रंग दाखवतो. एकही वाक्य यात नसताना सगळ्या भावना केवळ रंगाच्या , भावांच्या माध्य्मातून अतिशय प्रभावीपणे मांडल्या आहेत‌. सर्वांनी आवर्जून पाहावी अशी कलाकृती . अभिप्राय अवश्य कळ्वावा. पटाचा शेवट मुद्दाम दिला नाही कारण तो शब्दात सांगता येणार नाही .......