मी पण एक कविता करणार आहे ..!!

थांबा मित्रानो ..!!
थोडेसे क्षणभर थांबा 
दम घेउद्या मला 
सूर जराशे लावूद्या 
अन बघा मी काय करतोय ते 
मित्रानो मीपण एक कविता   करणार आहे 
 
कविता   म्हणजे असते काय 
खाली डोके  वरती पाय 
अहो मी पण तसेच करणार आहे 
हातावर मी देखील चालून 
शब्दांच्या  नाग्या काढणार आहे 
थांबा मित्रानो 
क्षणभर ..!
मी पण एक कविता  करणार आहे 
  
तीच तशीच  सिनेमाची गाणी 
तशीच चाल मीपण लावणार आहे 
नि तुमच्याकडून वाहवाचे  सूर   मी पण  घेणार  आहे 
थांबा मित्रानो 
क्षणभर 
मी पण एक कविता  करणार आहे 
  
खेड्यातून आलोय 
सालं शब्दाना वळणच नाही ना ..?
त्याना जरा एस नि फेस 
पाठीत रट्टा घालून शिकवणार आहे 
ऐकत नाही म्हणजे काय ..?
थांबा मित्रानो 
क्षणभर 
मी पण एक कविता  करणार आहे 
   
खूप कविता  वाचून मी तसेच थोडेफार गिरवून 
अगदी मस्त कविता  लिहिणार आहे 
थांबा मित्रानो 
क्षणभर 
मी पण एक कविता  करणार आहे  ..
कशा केल्या तुम्ही कविता  ..?
जरा तुमचीच कॉपी करणार आहे ..!
चालेलना  मित्रानो ..?
थोडसे थांबतायना 
क्षणभर ...
मी पण एक कविता  करणार आहे   ..!!