माझ्या लडिवाळ शेतावरचे काळे ढग !!

कठीण होत चाललेय सगळे
हे शेताचे बहरणे
आता गायब झालीय विहिरीतील मोटेचे पाणी
बैलाच्या गळ्यातील घुन्गारांचा  लडिवाळ आवाज
शेती नापीक दाखवून न.अ करीत चाललेत खूपशे
शेतात बंगले बांधून दिवाळी साजरी करू लागलेत 
आपली माणसे  
हिरवळीचा स्वर्ग होत चाललाय  नर्क
बैलगाडीच्या पायवाटा पुसून गेल्यात कधीच
नि फटफटीचा  चाक्राळलेला  रस्ता तयार झालाय 
संपन्नता आलीय डोक्यावर ह्या छोट्याशा  खेड्यात
फड लागतोय एखाद्या नारायणगावच्या तमाशाचा 
बहकून गेलेत श्रीमंत शेतकर्याचे ही पोरे
स्टार हॉटेल शेतात काढण्याच्या विचारात 
जातात ही  पोरे स्वप्नात हरवून  
शेतकर्यांच्या   पासोड्या हरवून गेल्यात
पैश्याच्या थैल्या घेऊन उडवल्या जात आहेत डान्स बारमध्ये
 
कठीण होत चाललेय येथे सगळे
आदिवासींची जमीन बंजार  दाखवून
नवा शोभिवंत शहर  होत चाललेय    ह्या जंगलात
नदी किनारी बांधून घरे  कालवे फिरवून गल्ली बोळातून
स्वप्न विकू लागलीत आपली माणसे
आणि आदिवासींचे पोस्टर लागून राहिलीत ह्या मोठ्या हॉटेलात
मधमाश्याच्या पोळ्यासारखी
 
 
अमेरिका करण्याचा विचार घोळतोय
स्वप्ने सुद्धा विकली जातात येथे
तशे पक्के व्यापारी भरपूर तयार होत आहेत
मास्टर ऑफ फायनान्सचे भरपूर कोर्स निघाले आहेत येथे
 
 
माझ्या लडिवाळ शेतावरचे काळे ढग ह्यांनी पळवून नेले आहेत 
नि माझी जमीन नापीक दाखवण्याच्या प्रयत्नात आहेत 
ही सगळी थोर थोर मंडळी 
पैशाचे आमिष लावलेय ह्यांनी गळाला 
मी कधीपण फसू शकतोय ह्यांच्या गळाला ......!!