मंथन

मंथन

आयुष्याचे मंथन केले
हाती काही न उरले
अमृत तुझ्या ओठी होते
माझ्या हाती मदिरेचे पेले

मोतीयाचे दाणे कावळ्यांनी नेले
राजहंसाच्या चोचीत मोतियाची टरफले
बाग गुलाबाचे अनेकांनी वेचले
हुळहुळणाऱ्या पायांना गुलाब न रुचले

वाळूंवरचे इमले लाटेने खचले
आठवणींनी तुझ्या मन माझे भिजले