प्रश्न सारे संपले
उत्तरही भिऊन दडले
कारणांचे कावळे
माझ्या मनी घोघावले
शब्द शब्द शस्त्र झाला
घाव जिव्हारी लागला
रक्तबंबाळ परी मी
उत्तराच्या आशेवरी
वाट पाही आवाजाची
अंतरीच्या चैतन्याची
दिवस काढणे फक्त हाती
सत्याचा आभास माथी
मीच घेतला मारूनी
असत्याचा शिक्का कपाळी
सत्याची होता होळी
अंधार अंग अंग जाळी