गाजर सूप

  • ५-६ मध्यम गाजरे
  • १ लहान कांदा
  • २ पेरं आल्याचा तुकडा
  • ३-४ मिरे, २ लवंगा, दालचिनीची एक मोठी काडी,
  • ड्राय बेसल लिव्हज
  • मीठ
३० मिनिटे
४ बाऊल सूप होते

गाजरांची सालं काढा. मोठे तुकडे करा. कांदा सालं काढून अर्धा करा. गाजराचे तुकडे आणि कांदा एका मोठ्या उभट पातेल्यात किवा कुकरात घ्या. त्यात आले, मिरी, दालचिनी, लवंगा इ. सर्व मसाला घाला आणि उकडा.
हे सर्व मिश्रण मिक्सर मधून फिरवून घ्या किवा हँड ब्लेंडरने घोटा. दाट, रवाळ पल्प तयार होईल. गरजेनुसार गरम पाणी घाला. मीठ घाला. बेसल लिव्ज घाला. खळखळून उकळू द्या.
कोथिंबिरीने सजवा.
गाजराचे सूप तयार आहे.

गाजर सूप

आमची मैत्रिण सुझान हिची खासियत असलेलं हे गाजर सूप!

सुझान