पाणी.... माती....... (१)

कसं असतं ना.....
माती आणि पाणी यांच नातंच निराळं.......
पाण्यातल्या मातीचे प्रमाण जास्त असेल तर.........
पाणी दिसत नाही........ अन..........
मातीतल्या पाण्याचं प्रमाण जास्त असेल तर.........
माती दिसत नाही.........
.......
...............
माणसाचंही असंच असतं काहीसं......
कधी मातीच्या देहात डोळ्यातले पाणी दाटते...........
तर कधी.........
डोळ्यातल्या पाण्यात मातीचा देह विरघळतो.......
अन मग.....
....................
.........................
कधी माती..... कधी पाणी......
कधी पाणी..... कधी माती.....

|- परीकथेतील राजा -|
(०६/०१/२०११)