गोष्ट

मी ती गोष्ट शोधतोय......

बऱ्यासश्या हाताला लागतायत..........

.......

..............

लहानपणी आज्जीने सांगितलेली त्या राजकन्येची..........

शाळेत मस्ती करता करता मीच सांगितलेली कापूसकोंड्याची........

इतिहासाच्या सरांनी सांगितलेली आठव्या हेंद्रीची.......

आजोबांनी सांगितलेला शिवबांचा इतिहास........

आईने मांडीवर बसवून सांगितलेली ध्रुवबाळाची........  

आशा किती साऱ्या गोष्टींनी वेढलेय मला..........

............

.....................

पण मला ती गोष्ट सापडत नाहीय्ये......

निळ्या डोळ्यांच्या...... उडणाऱ्या....... परीची........

पऱ्यांच्या स्वप्नील नगरीत घेऊन जाणारी.........

..........

.................

कां कुणास ठाऊक..... परंतु आता माझी खात्री पटलीय......

ती गोष्ट तूच सांगू शकतेस.....

निळे डोळे मिचकावत सांगायचीस ना.... तश्शीच.......

मी तीच गोष्ट शोधतोय...... अजूनही............

|- परीकथेतील राजा -|

(१७/०१/२०११)