स्वप्न बघायला हरकत काय ..!!

 
प्रेम ..!!.
प्रेम अगदी  मस्त असते 
प्रेमाचे एक गाणे असते 
बाईकवर बसले 
की ते छान फुलून येते 
कळीचे फुल होते 
सुरवटाचे फुलपाखरू होते 
प्रेम अगदी मस्त असते 
कसे होते ..?  
कधी होते ...?
ते कळते कोठे ..?
हे सगळे नकळत होते 
म्हणून ते प्रेम असते  
  
शांत  रस्ता 
छान ढग 
आता प्रवास छान होईल  
छान हवा गाणे गायिल 
गळ्यात असतात 
लडिवाळ हात 
गालावर रेंगाळतात  
अलगद श्वास ....!!
हे खूप छान असते 
हे खूप छान वाटते  
 
 
मस्त मस्त हवा 
नि हवे तेवढे सुख 
मन तृप्त.... !
अतृप्त ........!!
हवी हवी  हावरट हाव 
रोमारोमात पसरत जाय 
रक्तामध्ये झिंगत जाय  
लंपट लोचट 
जिभल्या चाटीत 
कुठतरी  हरवून जाय 
प्रेमामध्ये  असेच असते 
असेच होते ....!!
 ..
प्रेम जमले  की , 
छान वाटते  
आभाळाचे 
गाणे होते 
त्याच्या मुठीत चांदण्या असतात 
उधळल्याकी 
फुले  होतात 
  
अरे एकच  सांगायचेच विसरून गेलो   
रस्त्याचे पण एक गाणे असते
पाखरांचे संगीत असते 
आभाळाचा निळा रंग 
पाण्यामध्ये सांडत असतो 
बाईकवर असले की सगळे 
असेच असते 
बघा... 
तुमचेपन तेच होईल 
आभाळाचे गाणे होईल ......!!