काही शब्द तुझे माझे.. अचानक नकळत जुळलेले अपरिचित वाटेत चालत किती सहज रुळलेले
काही शब्द तुझे माझे.. चिंब पावसात भिजलेले ओल्या मातीत मधल्या सुगंधात दरवळलेले
काही शब्द तुझे माझे.. आभासात भेटलेले हरपून स्वतःला त्यात मी तुला शोधलेले
काही शब्द तुझे माझे.. न बोलता हि कळलेले
मनातल्या भावनांना
कसे अचूक टिपलेले
असे शब्द तुझे माझे..
प्रत्येक क्षणात सजलेले भेटतील तुला अगणित खुणा अर्थ शब्दांच्या पलीकडले !!
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.