स्वताच्या पोटाला चिमटा घेत ...!!

रेतीचा आखा ट्रक आला 
कामगार फावड्याने रेती काढीत ढकलू लागले 
बंगल्याच्या आवारात  
काळा तजेलदार तरणा पोरगा 
रेतीचे  हात झटकित  
मालकाजवळ आलां 
पैश्यासाठी खोळंबून 
मालक पैशे द्या म्हणाला ...
मालक म्हणाला पावती 
नम्रपणे म्हणाला देतो जी पावती 
पावती पुस्तक काढून बनवली पावती त्याने 
सुंदर अक्षर बघून मालक आडवा तिडवा चाट ..!!
मउपणे  मालक म्हणतो शिकलाय कारे 
खाली मान घालीत पोरगा म्हणतो 
शिकलोय कोलेजची पुरी वर्ष 
मग ..?
गावाकडून आलो 
पोटापाण्यासाठी 
हिंडलो दारोदारी
कचेर्यात ,कंपन्यात 
नौकरीसाठी
ओळख नाही
पाळख नाही  
पत्ता नाही 
नोकरी कोठे गरिबासाठी ...?
पोटासाठी शेवट रेतीची गाडी 
शंभर रुपये दिवसाकाठी 
पोटाला चिमटा घेऊन साठवतोय   पैशे 
भावाच्या शिक्षणासाठी...!! 
नि हलकेच चालू लागला ट्रककडे  .
स्वताच्या पोटाला चिमटा घेत 
आजचा दिवस नि 
उद्याचा काळोख तुडवण्यासाठी  ........!
.