कसे उदास नि बेचव वाटते हे आयुष्य
हे क्षण
उत्साह संपून सारे गोठून जातात
आनंदाचे क्षण
नि
कशे आठवत राहतात
प्रेम तुटल्याचे क्षण
सरळ नकार
त्याच्या मर्दपणाची
बेदम हार ..!!
हातात हात घेऊन ते कुठे गहाळ होतात क्षण
आणा भाका प्रेमाच्या
क्षणभर मिठीत
विरघळून गेलेले
ते हळुवार क्षण
तो स्पर्श
ती बेहोष नजर
मोहित होऊन स्वताला विसरून गेलेले क्षण
कितीतरी काळ लोटला हरवून गेला
आठवण आली की
भळभळते जखम
ही ओली
तिची आठवण
कालच ती स्वप्नात
जशीच्या तशी
नि मग तो विसरून गेला
त्याचे उदासपण क्षणभर
नि गोंजारत बसला
त्या जुन्या आठवणी
ते स्पर्श
त्या शपता ..
तो खणीत बसलाय
आठवणीची
भुसभुशीत
जमीन
कधीची ...!!
कदाचित अजूनही आठवणी सापडतील
नको ती
गाभुळलेली
आंबट चिंबट
नि ते ओले क्षण ...!!
a