स्वगत

नातं कसं मुरत जात आहे
काळ जाईल तशी गोडी वाढत जाते ना तसा काहीतरी
तीच व्यक्ती प्रत्येक वेळी नव्याने कशी काय भेटू शकते?
असं वाटतं हे सगळं इथंच होतं, मग आपल्याला इतक्या उशीरा का जाणवलं?
जाऊ दे, सोडून द्यावं स्वतः ला अगदी मुक्त, या शहाण्या जगाच्या सिमे पलीकडे
आनंदाच्या राशी मांडून बसायला हे जग अपूरच पडणार बहुदा
सगळं समजूनही मन वेडेपणा करतं ना तेंव्हा खूप त्रास होतो
मग वाटतं, हा नात्यांचा गुंता वाढवण्या पेक्षा तो स्वीकारणं खूप सोपं करेल सगळं
पण मग एकदा स्वीकारल्यावर तटस्थ होणं जमेल?
एकेक पाश सोडवताना माहीत नाही कसं होईल
ह्या परिस्थितीत तरी सगळं सुंदर, हवहवस आहे
ते तसं राहावं पण वाटताय आणि राहू नये असा सुद्धा
हे माझ्यासाठी चांगलं, हे वाईट कोण ठरवणार?
सगळंच तर नियतीच्या हाती सोपवून बसलेले मी
ती सूत्रं हाती घ्यावीच लागतील, निदान उद्या साठी
आणि या शहाण्या जगा साठी.