संग

निस्संग होतो जरी
संग हवासा होता
शब्द मूक होते तरीही
आर्त होती आतुरता ॥

पथिक प्रेमाचे जरी
पंथ वेगळाले होते
बंध चरणी काटेरी
मने घायाळ होती ॥

क्षण हयातीचे अखेरी
कातर स्वभावेच होती
उमेद आशेला तरीही
निर्बंध दिव्य संगाची ती ॥