(वाचन करता करता सहज सुजलेल्या चार ओव्या)
सहज प्रासादिक| भक्ताची प्रवृत्ती|
वृत्ती ची "निवृत्ती"| तेणे साध्य||
केले गंगार्पण| वृत्तीचे निर्माल्य|
उरले कैवल्य| "ज्ञानदेव"|
अमला भक्तीने| चित्ती समाधान|
ज्ञानाचा "सोपान"| प्रकटला||
ज्ञानाच्या उजेडी| मायेचा अंधार|
लोपला साचार| तीच "मुक्ती"||
- हरिभक्त