सारथ्य "माणुसकीचे"

हजारो कोटींची उलाढाल असलेल्या उद्योगपतीच्या ड्रायव्हरचे निधन
झाल्यानंतर त्या उद्योगपतीची प्रतिक्रिया काय असेल....त्याला दुःख होईलच,पण
आपल्या हातातील कामकाज सोडुन त्याच्या अंत्यविधीसाठी पुण्याकडे
हेलिकॉप्टरने पुण्याकडे धाव घेणारा आणि ड्रायव्हरने तीस वर्षे सेवा केली
म्हणून त्याच्या शेवटच्या प्रवासाचे ड्रायव्हिंग आपण स्वतः करणारा
उद्योगपती नुकताच पुणेकरांनी पाहिला.

आजच्या कलीयुगात जिथे पैसा म्हणजे सर्वस्व झाल आहे तिथे पैशाहुन ही
माणुसकी मोठी असते याचा प्रत्यय आपल्या कृतीतुन देणारे हे उद्योगपती आहेत
झवेरे पुनावाला.त्यांच्याकडील गंगादत्त या ड्रायव्हरचे नुकतेच निधन
झाले.त्याचे निधन झाले तेव्हा पुनावाला मुंबईला महत्वाच्या कामासाठी गेले
होते.गंगादत्त यांच्या निधनाची बातमी कळताच त्यांनी आपल्या सर्व मिटींग
रद्द केल्या.त्याच बरोबर मी येइपर्यंत गंगादत्त यांचे अत्यंसंस्कार करु नये
अशी विनंती गंगादत्तच्या कुटुंबयींना करण्याचा निरोपही दिला.त्यांना
अत्यंसंस्कारांसाठी उपस्थित राहयचे होते.त्यांनंतर त्यांनी खाजगी
हेलिकॉप्टरने पुण्याकडे धाव घेतली.

पुण्यात आल्यानंतर त्यांनी गंगादत्त जी लिमोझीन चालवायचा ती फ़ुलांनी
सजविण्यास सांगितली.ती लिमोझीन पुनावाला यांनी विकत घेतल्यापासुन गंगादत्त
यांनीच चालवली होती.त्यामुळे गंगादत्त याची अंत्यंयात्रा याच गाडीतुन
व्हावी ही पुनवाला यांची इच्छा होती.गंगादत्त यांच्या कुटुंबीयांनी याला
मान्यता दिल्यानंतर पुनावाला या अत्यंयात्रेत सहभागी झाले.

ज्याने आपल्यासाठी आयुष्यभर गाडी चालविली त्याच्या शेवटच्या
प्रवासामध्ये आपण गाडी चालवुन आदरांजली वाहिली पाहिजे या भावनेतुन त्यांनी
गंगादत्त यांच्या घरापासुन स्मशानभुमीपर्यंत गाडी चालवली.

यावर झवेरे पुनावाला यांची प्रतिक्रिया होती.... "पैसे तर सगळेच कमवितात
पण ते कमविताना ज्यांच्या जोरावर आपण ते कमवितो त्यांच्याविषयी आपण
कृतज्ञता बाळगणे आवश्यक असते."

मागील आठवड्यात हीच बातमी पुणे म.टा.मध्ये आली होती...आजच्या जगात जिकडे
तिकडे स्वार्थ,भ्रष्टाचार,गुन्हेगारी माजलेली असताना मिट्ट काळोखात
मिणमिणता प्रकाश दिसावा..असाच हा प्रसंग आहे.