रताळ्याचे काप !!

  • १/२ किलो रताळी
  • १/४ वाटी साजुक तुप
  • १/४ वाटी साखर
  • १ चमचा वेलदोड्याची पुड
  • ४/ ५ लवंगा.
५ मिनिटे
४-५ जण

रताळ्याचे काप.

रताळी १/२ तास पाण्यात भिजवून ठेवावी, म्हणजे त्याला लागलेली माती पाण्यात विरघळून जाईल. परत एकदा रताळी स्वच्छ दुहून व नंतर पुसून घ्यावी. (रताळ्याचे काप आपण सालासकट करणार आहोत, म्हणून येवढे सोपस्कार... ) नंतर बट्याट्याच्या काचऱ्या करताना जशे बटाटे कापतो तशी रताळी कापून घ्यावी, गोल- गोल आणि साला सकट.

मध्यम आचेवर एका कढई मध्ये पाव वाटी तूप घेऊन, त्यात ४-५ लवंगा घालाव्या. मग रताळ्याचे काप घालून रताळी छान परतावी. रताळी एकसारखी ५/१० मिनिटे छान परतत राहावे. रताळ्याचा रंग पांढऱ्याचा हलका पिवळा होईल. त्यावेळेस समजावे की रताळी शिजली, आता त्यामध्ये १/४ साखर पेरावी व वेलदोडेपुड घालावी. ५ मिनिटे मंद आचेवर हळुवार हालवावी. (हे लक्षात ठेवा की रताळी आता शिजलेली आहेत, भसाभसा हलवली तर ती तुटतील, आणि आपल्याला रताळ्याचे गोल-गोल काप - न तुटलेले हवे आहेत.. ) 

वा!! मस्त रताळ्याचे काप तयार आहेत.

आई म्हणते जेव्हा आपण एखादा तूप घालून - गोड पदार्थ बनवत असतो त्यावेळी तूप गरम करत असताना ४/५ लवंगा टाकल्या तर त्या गोड पदार्थाला हलकेच आणि कळत-नकळत तिखटपणा येतो, ज्यामुळे गोड पदार्थाचा स्वाद अजून वाढतो.

उपासाच्या दिवशीची स्पेशल स्वीटडिश.

उपास अस म्हणून-म्हणून आपण जास्तच खातो का??? ह्याला खरंतर मग उपास न म्हणता Change Of Taste/ चवबदलं  म्हणता येईल, पण मराठीमध्ये ह्याला अजुन अचुक काय म्हणता येईल बरं ???

आई