ते अलवार नाजूक,तरल क्षण.... !!

कशे होते ते क्षण ..?
तरल अनुभव ..
नाजूक क्षण..! 
फिरून फिरून डोकावून 
हरवून जातेय माझे मन 
ते अलवार नाजूक तरल क्षण 
 
खूप छान 
मस्त देखणी 
डोळ्यात भरून हरवून गेली 
एकदम मनात जाऊन बसली 
विसरून गेले ते मी पण 
 
छान  साडी 
नाजूक साधी 
नाकी डोळी 
सुंदर सुंदर 
हरवून गेले माझे मन 
विसरून गेले सारे मी पण 
   
त्या नजरेचा
स्पर्श मुलायम ...
हलके हलके 
बावरून मन 
आभाळातील शुभ्र ढग 
मनास  पिंजून ...
मनावरून फिरून गेले  
ते अलवार नाजूक तरल  क्षण 
  
किती  काळ उलटून गेला 
छान  दिवस हरवून गेले 
निळ्य निळ्या आठवणीचे 
अजून मला स्वप्न पडते 
अजून मन धुंदावून... 
आठवून मन व्याकुळ ..होते .
ते अलवार नाजूक तरल क्षण .......!!