' सुखाचा ठेवा -'

मी बालपणी खेळविले, तुज खांद्यावर नाचविले
तुज खेळविता मी बाळा, ना केला कधी कंटाळा
तू किती जरी मज छळले- तव खेळी मन विरघळले
कधी घोडा-घोडा झालो; ओझ्याचे गाढव बनलो!
तू तळहाताचा फोड, पुरविले सर्व तव लाड
ठेवून 'रोज' मनी स्वार्थ, ना घालविला क्षण व्यर्थ!
कालांतरी होशिल मोठा! सन्माना नसेल तोटा!
नोटांच्या पायघडया त्या- कुणी  घाली सामोरी त्या
ना विसरावे तू मजला, ही एकच आस मनाला!
कधी  कुणापुढे ना झुकलो; परी  आता मी रे थकलो-
'ती' इच्छा मम पुरवावी ' मज वृद्धाश्रमी न ठेवी! '
तव खांदा मला मिळावा- मजसाठी "सुखाचा ठेवा"!