स्वातंत्र्याची किमंत...!!

कुठून तरी आली कावळ्याची जीवघेणी कावकाव 
आंधळेपणाने दिवसाच्या प्रकाशात उडणारा 
पिंजर्यातून निसटून आलेला पोपट 
घाबरून झिडपिडत  टकरा खात होता  भिंतीला 
आंधळेपणाने उडत होता कावळ्याच्या  नजरेतून गहाळ होण्यासाठी
जीवाच्या आकांताने
जीव घेउन
घाबरून वळचणीला जाऊन बसत   
आपल्यातच गुंतत 
खोल काळोख्या गुहेत .......!!
 
  
कावळे पंख झापडत त्याला टोचा मारायच्या  प्रयत्नात 
तो  मिट्ट मख्ख , आपल्याच नादात 
त्याच्या उडण्याचा  अंदाज 
काळोखात लुप्त 
पिंजर्यात राहून 
उडण्याची ताकद हरवून बसलाय 
कधीच 
च्रीप च्रीप चा नुसताच  चित्कार ....!! 
 
सतराशे साठ कावळे 
नि एकटा  पोपट 
आंधळेपणाने   झुंझत होता  केविलवाणा 
अभिमान्युसारखा ...! 
आवाजाचे लक्ष साधित 
तो  बचाव करतोय 
आपल्या  प्राणाचा ..!!
 
कावळे टोचून त्याला करीत होते हैराण 
शेवटी गलितगात्र होऊन पोपट मिटून बसला 
कावळ्यांनी गलका करून त्याला घेरून टाकले 
पोपट  प्रतीक्षा करतोय आपल्या शेवटच्या श्वासाची 
तो गप्प ,निमूट , पंख मिटून 
वाट बघत बसलाय 
शेवटच्या क्षणाची 
पिंजर्यातून निसटून आलेला पोपट
त्याला द्यावी लागतेय किमंत स्वातंत्र्याची  ...!!