प्रहार

का थांबलास ओथंबलास झोकून देण्या हो तय्यार

वाट कुणाची बघशी आता शेवटचा तू कर प्रहार   //

कुणी भासवी मी मोठा तर छोटा होऊनी कुणी राबतो

मोठ्यांच्या ओझ्याखाली मग शेवट पर्यंत दबून राहतो

हलवून आता भार शिरीचा मोठ्याने तू कर फुत्कार  /

उगा कशाला मनाची तगमग निर्णय घेऊन टाक तू लगबग

कशास रडशी गळे काढूनी  कशास नेशी वेळ मारूनी

तूझ्याविना अडले ना काही तूझ्याविना काही ना अडणार  /

श्वासांचे टाकीत उसासे कुठ्वर आता जगायचे

एक घाव अन दोन तूकडे करूनी आता पहायचे

तुकड्या तुकड्या मधूनी जयाचा घोष नभी बघ दुमदुमणार  /