"दिमाखदार एस. टी. "
अशी आमुची एस.टी. दिमाखदार बाई ।
काही खिडक्या उघड्या, काही बंद होत नाही॥ध्रु॥
जागो जागी सीट फाटलेले । खिडकीजवळ पच पच थुंकलेले।
धुऊन काढण्याची, कोणी तसदी घेत नाही॥१॥ध्रु॥
जुने पुरणे टायर त्याला गेटर लावलेले।तसेच एक टायर स्टेपनी म्हणून ठेवलेले।
रस्त्यातकुठे बंद पडेल याचा नेम नाही॥२॥ध्रु॥
अनंत खोंडे.
२०\२\२०११.