त्याने फेस बुकावर त्याचे नाव दाखल केले आहे
पण फोटो नाही टाकला
पासपोर्ट साईझ ..!!
एकतर त्याच्याकडे फोटोच नाही
असला तरी तो खूप जून वाटतोय
खराब चेहरा
थोडासा चकणा डोळा
डोक्यावरचे उडालेले केस
मस्त टक्कल
पण तरीही नेटवर एक आकृती छापलीय गेलीय
एक नकाशा उमटलाय
शरीर अववयाचां ...!!
बिन चेहर्याचा
तो खूष आहे त्या फोटोवर
बिन चेहर्याचा फोटो
त्याला खरेच मस्त वाटतोय
त्याचे सुख
त्याचे दुख
तो शब्दातून मांडू लागलाय
एक निरागस कोवळेपण
आभाळातील उधळलेल्या मुठभर चांदण्या
नि चंद्राचा पिवळा प्रकाश
मनात काहूर माजवतात
तुमचे नाव पण नाही, नि फोटोचां नकाशा ..?
नकाशाचा फोटो बघायला बरे वाटते बघा
त्याने असाच नकाशाचा फोटो
टांगून ठेवायला लिहून ठेवलय
त्याच्या पश्चात
त्याच्या पोराना
नकाशा बघून मित्र म्हणतील
हे तुमचे बाबा कां ..?
बाबाचे चित्र तुम्ही रंगवू शकता
तुम्हाला हवे तसे
तशी सवलत
दिलीय तुम्हाला ....!!