प्रेम

प्रेम

मागितल्यावर मिळते
ति प्रतिभा नव्हे
पुसल्यावर उजळते
ति प्रतिमा नव्हे

तापविल्यावर चकाकते
ते सोने नव्हे
पैलू पाडल्यावर चमकतो
तो हिरा नव्हे

जे काही असेल
ते उपजत हवे
प्रेम हे
अंतरीच हवे

राजेंद्र देवी