" रुग्णाची व्यथा"
शस्त्रक्रिया करण्याची डॉक्टर सल्ला देतात ।
रुग्णाची चिरफाड करून आपला गल्ला भरतात ॥
त्यांना नसते रुग्णाच्या सुखदु; खाची पर्वा ।
गरीब वा श्रीमंत एकाच मापात तोलतात सर्वा ॥
पदवी घेतांना डॉक्टर देतात रुग्ण सेवेचे वचन ।
पदवी घेतल्यावर त्यांना होते त्याचे विस्मरण॥
कोणताही किरकोळ असो आजार,
त्याला गंभीर स्वरुप देतात ।
पैसे लाटण्यासाठी रुग्णास,
अतिदक्षता विभागात ठेवतात ॥
औषधांचा दवाखान्यात चालू असतो व्यापार ।
किंचित वापरण्याचे सोंग करून तेच देतात वारंवार ॥
दवाखान्याचे बील सतत ते फुगावीत राहतात ।
रुग्ण बरा होत आहे असे सांत्वन करीत असतात ॥
पाहून बील दवाखान्याचे रुग्णास पडत नाही आराम ।
लवकरच तो जीवनास" करतो मग राम राम"२ ॥
[ टिप--प्रामाणिक डॉक्टरांची क्षमा मागून]
अनंतखोंडे.
२५\२\२०११.