"निर्ल्लज्जं सदा....!"
पांढर्या डगल्यामध्ये सर्व नेते,
फिरत असतात ।
स्वच्छपणाचा आव आणून भ्रष्टाचार,
करत असतात ॥
नसते त्यांना जनतेच्या,
आडी अडचणीची पर्वा ।
गाजर दाखवून योजनांचे,
लुटत असतात सर्वा ॥
स्वतः: अडचणीत आले की,
संधी बघतात ।
पांढरी टोपी बदलून,
भगवी डोक्यात घालतात ॥
कितीही आले बालंट तरी,
निर्लज्जा सारखे वागतात ।
काहीच केले नाही आपण,
असे ओरडत राहतात ॥
निर्लज्जं सदा सुखी,
ही म्हण आहे खरी ।
नेत्यांकडे बघून माझी,
" खात्री पटली पुरी"२ ॥
अनंतखोंडे.
२८\२\२०११.