स्वप्नी गुलाम मोर रानामधे मोहोर
कंठातुनी स्वरांना कोकीळ गीत गातो
आभाळ चांदण्यांचे पक्षी कवेत घेतो
चंद्राविनाच सारे अवसेस पूर येतो
इंद्रास हे कळे ना स्वर्गातले पिसारे
हलक्या पदारवांनी घेऊन कोण फिरतो
देवाधिदेव आता संमोहनी मनी तो
खारे पिसून अवघे ऋतु मंथनी उधळतो
गंधास रंग नवखे पिचला कणा उभरतो
आशेस अंकुराचा नवनीत कोंब फुटतो
प्रसवात वेदना परि सृजनात जीव रमतो
आवेग भावनांचा भवसागरी पसरतो