लिहिता लिहिता अचानकच हातातल्या लेखणीला फुटले हात अन पाय,
डोळे भरून आले तिचे रडू लागली अन काय?
म्हणाली "बस्स झालं आता आला मला कंटाळ
विचार करते रात्रंदिवस कसा बसेल कष्टांना आळा
घातला सगळ्याच लेखक कवींनी माझ्याभोवती वेढ
कधी संपेल कुणास ठाऊक हा दुष्कृत्यांचा पाढा?
झाला आहे उंचच उंच कधीतरी खुंटेल का भ्रष्टाचाराच्या झाडाची वाढ?
जागोजागी उसळतोय प्रदूषणाचा भस्मासु
खून रक्तपात मारामाऱ्या का झालायस माणसा इतका क्रूर?
पुरे झालं लेखकांनो लिखाण तुमचं थांबवा आत
लिहून लिहून शाई संपली दुखू लागला माझा माथा
बस्स झालं आता किती द्याल मला कष्ट
लिहूनसुद्धा जगातलं वाईट होणार आहे का नष्ट? "
हाच शेवटचा प्रश्न विचारून लेखणी म्हणाली शोध उत्तर
या एकाच प्रश्नावर माणूस होतो नेहमी निरुत्तर.