प्रश्नचिन्ह

प्रश्न असे की नसेच उत्तर

तरी पडावे मजला सत्तर
वैतागून मी पुन्हा पुसावे
प्रश्न पुराणे पुन्हा एकदा
उत्तर नाही प्रश्नच मिळती
कर्मभोग हा सदासर्वदा..