संदर्भः दुवा क्र. १
मित्रहो,
आज दोन द्विपदी देत आहे. विषय सारखा असला तरी दोन स्वतंत्र रचनांची शक्यता वाटते.
१) होत नाही हवे तेव्हा भेटणे ठरवूनही
कुठे होते मनाजोगे बोलणे भेटूनही !
२) बोलणे होत नाही म्हणावे तसे
ह्या मनीचे सखीला कळावे कसे !
इथे दोन काफिये वापरायचा प्रयत्न असून रचनेच्या सर्व द्विपदींत तो साधला तर बहार येईल !