आठवणी ... !!

आठवणी असतात कोठेतरी लपून बसलेल्या 
आठवणी येतात अचानक 
अनाहूत ,  अलगद
 नकळत मनाच्या काठावर 
न आठवता आठवणी   येतात 
मनाच्या दारावर ठक-ठक करतात 
नि येतात समोर 
नि आपण  भन्नाट चकित  
 
आठवणी कधीकधी भासाच्या
कधीकधी त्रासाच्या 
मनात रुजलेल्या 
पिंपळाच्या झाडासारख्या खोल पसरलेल्या 
ताज्या, पटत नाहीत तरी त्या खूप खर्या वाटतात 
डिलीट करतात येत नाही 
मरता मरता कोंबडीच्या मानेतून अंडे पडल्याची आठवण 
कधी पुसता येत नाही 
  
काही आठवणी नाजूक 
प्रेमाच्या , नव्या नव्हाळीच्या 
अलगद मोरपिसी आठवणीच्या 
अल्लड पाउस नि 
तिच्या सोबत चिंब चिंब  भीजल्याच्या 
गरमागरम चायच्या 
 
आठवणी नाही होत शिळ्या 
नाही उडत त्याचा रंग 
त्या असतात रंगीत 
आंबट- चिंबट 
मस्त चवीच्या ..!!
कधी कधी असतात काहीशा कडू 
तरी त्या असतात तशा मुरलेल्या 
काहीशा सुखद वाटतात त्या कडू आठवणी देखील
  
आपले जुने मातिचे  घर 
आठवणीतून अलगद येते वर 
ती श्रावणातील सकाळ 
परीक्षेचा  पेपर 
तो  कोंबडा छाप ब्लोटिंग  पेपर 
नव्या पुस्तकांचा करकरीत वास 
आपल्या अंतरंगात झीरपतात  
मृदुगंधासारख्या ...!!
शाळेला मारलेल्या दांड्या 
पोट- दुखीचे अस्सल कारण 
मग अंगावर पांघरून घेऊन 
शुभ्र ढग न्याहाळत 
पक्षी बनून  छेदून ढगाला
स्वप्नात हरवल्याचे क्षण ....!!
कोठे हरवून गेले 
कधीचे …..
शोधत बसतो कधीपण 
डोळ्यातला एक थेंब 
फक्त साक्षीला ....!!