"माझी सच्चाई"
ते करू देत काही, मी करणार नाही।
कामात कधी माझ्या, भ्रष्टाचार होणार नाही॥
किती आला जरी दबाव, त्याला मी भिणार नाही।
कामात सातत्य ठेवीन, कुचराई करणार नाही॥
दावोत मला स्वप्ने , त्याला मी भुलणार नाही।
निष्ठेने जाईन पुढे, मुळी डगमगणार नाही ॥
या माझ्या लढ्याला, मी एकटाच आहे।
म्हणती जरी बावळा, तरी सच्चाई सोडणार नाही ॥
अनंत खोंडे.
१५\३\२०११.