" भटक्या"
हातावर पोट घेऊन, सतत मी फिरत असतो ।
कधी खातो वाळेल कुटका, कधी पाणी पिऊन झोपतो ॥
शेजारी टि. व्ही. लावतो, तोच मी बघत राहतो ।
घोटाळ्यांचे ऐकून किस्से, मनी खिन्न होत जातो ॥
'आदर्श'सदनिकांना, दूरून न्याहाळतं असतो ।
मी राहीन का त्यात?, हे स्वप्न रंगावीत बसतो ॥
आलिशान मोटार गाडीवाला, अंगावर धूळ उडवतो ।
मी मात्र दूरूनच ती,मोटार गाडी बघत राहतो॥
अनेकजण निजलेल्या रस्त्यात, मी माझी पथारी टाकतो ।
मिळेल चांगले काम उद्या, या आशेवर मी झोपतो॥
उद्या कधी येत नाही, मी असाच कफल्लक राहतो ।
काम मिळवण्यासाठी पुन्हा, "वणवण भटकत फिरतो"२॥
अनंत खोंडे.
१६।३।२०११.