अचानक नकळत कशा उठल्या ह्या समुद्राच्या पोटातून कळा
कशा अंगात आल्यागत उठू लागल्या ह्या लाटां
गुदगुल्या करीत खेळतायत असे वाटता वाटता
कशा उन्मत होऊन गेल्या
नि बरबाद करून गेल्या ह्या लाटा.......
म्हणता म्हणता कशा उत्कट वेगाने उसळून गेल्या
नि घरे दारे कवेत घेऊन
रस्ते गाड्या बरबाद करून गेल्या
ह्या प्रचंड त्सुनामी लाटा
नाग जेव्हा सरपटतो तेव्हा खरेच नाही कळत तो साप आहे की नाग
फणा काढतो तेव्हा त्याचा बघावा बेफामपणा
तशा ह्या प्रचंड लाटा ....
टीवी वर बघायला हे सगळेच भन्नाट
रोमहर्षक
चित्तथरारक वाटते
३२"ईन्चि टीवी तर क्या बात ?
चहा पिता पिता हे सगळेच बेफाम
आणि वर्ड- कप क्रिकेट बघताना
मधूनच हे सगळे बघता येते
हे सगळे ह्या वयात निर्जीपणे बघत असतो तो
त्याचा पोरगा असतो बोटीवर
नि सुखरूप असतो
काळजाचा ठोका चुकतो
पण सुखरूप ऐकून जीव भांड्यात पडतो
कालच मला भेटला त्या मुलाचा बाप
मुलगा सुखरूप म्हणून आनंदून गेला होता
डोळ्यातला थेंब खूप काही सांगून गेला होता
डोळ्यातला थेंब पुसत
आणि हे चालायचेच असे म्हणत होता ..
लाटा येतील लाटा जातील
त्सुनामी काय करील ते करो
माझे पोर सुखरूप
मुलगा पास झाल्याचा आनंद
केवढा भन्नाट असतो नाही ...??