होळी

होळी

सुवर्ण रंगाने भास्कर
खेळे वसुंधरेशी होळी
मेघराज बरसुनी
भिजवी हिरवी काचोळी

संध्याछायेच्या गालावरती
रंग गुलाबी उधळी
रजनिच्या कुशींत शिरे
रात्र हि काजळी

जाईंच्या वेलीवर डुले
नाजुक कळी
चंदाराणिच्या गालावरती
उमले गोड खळी

राजेंद्र देवी