गंगेवरची मिसळ ...!!

गंगेवरची मिसळ खाताना 
आता जराशी भीती वाटते 
कोलोस्टार वाढले आहे
कधी काहीपण होऊ शकेल असे डाक्टर म्हणत होते 
गंगेवरची  मिसळ मात्र खास लज्जतदार नि भन्नाट  आहे 
झणझणीत मिसळ नि तर्री लाजबाब आहे 
ह्यां तिखट जाळ तर्रीने 
असीडीटी   वाढते आहे 
डाक्टर म्हणतात बंद करा असले खाणे 
कधी काहीपण होऊ शकते 
  
मरणाची भीती वाटते ..?
पण...
जगणे किती अवघड आहे 
आता जगण्यापेक्षा  सुद्धा 
मरणे शप्पत सुंदर आहे ..!!!
 
गंगेवरची मस्त  मिसळीची गाडी 
सूर लावून उभी आहे 
सकाळची वेळ ..
रेशमासारखी हवा ....
गुदगुल्या केल्यासारखी सूर्याची केशरी किरणे 
बाजूने वाहणारी गोदावरी 
नी वाफाळलेली मिसळ नि त्यावरची तर्री 
खाऊन घ्या मस्त 
नि जगुन घ्या क्षणभर ...[?]
 
मरत मरत जगण्या पेक्षां 
जगत जगत मरणे 
शप्पत  सांगतो 
ह्यात काही अवघड   नसते [!!]
 
खाल्ली नसेल मिसळ तर जरूर खाऊन  बघा 
जिभेचे चोचले जरा पुरवून बघा 
खूप जण खातात 
तो पण खात असतो 
तुम्हीपण खावून बघा 
उद्या तो असेल- नसेल [?]
त्याच्या शब्दाला मान द्या 
गंगेवरची झणझणीत मिसळ  
 जरा खाऊन  बघा ..!!